विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित
गोंधळ घालणार्या सदस्यांना अधिवेशन चालू असेपर्यंत निलंबित केले पाहिजे आणि त्यांच्याकडून कामकाजावर होणारा व्यय वसूल केला पाहिजे !
नवी देहली – लोकसभेत सकाळी विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. दुसरीकडे राज्यसभेचे कामकाजही दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होऊन एक आठवडा उलटला आहे. या काळात विरोधकांकडून शेतकरी आंदोलन , ‘भास्कर’ समुहावरील धाडी आदींवरून टीका केली जात आहे.