अमरावती येथे डेंग्यू आजाराच्या संसर्गात वाढ झाल्याने रुग्णालयात सहस्रो रुग्णांची गर्दी !
‘संतांनी सांगितलेला हाच तो आपत्काळ आहे’, हे लक्षात घेऊन सर्वांनीच साधनेला प्रारंभ करणे आवश्यक !
अमरावती – जिल्ह्यात डेंग्यूची साथ आली असून शासकीय आणि खासगी रुग्णालयांत डेंग्यू झालेल्या सहस्रो रुग्णांची गर्दी झाली आहे. जिल्ह्यात डेंग्यूसह पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्ययंत्रणा सिद्ध होत असून शहरात सर्वत्र औषध फवारणी केली जात आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालये, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, तसेच जिल्हा रुग्णालय येथे मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण भरती झाले आहेत.
शीतयंत्रातील (कुलरमधील) पाणी स्वच्छ न केल्यामुळे साचलेल्या पाण्यात, तसेच दुचाकी वाहनांच्या ठेवलेल्या ‘टायर’मध्ये पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या होतात. एखाद्याच्या घरात किंवा घराच्या परिसरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.