अमरावती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे !
ताफा अडवण्याचाही प्रयत्न !
अमरावती – जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी आलेले राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या वाहनांचा ताफा बोरखेडीजवळ येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी कार्यकर्त्यांनी वाहनांच्या ताफ्याला ‘काळे झेंडे’ दाखवून भुसे यांचा निषेध केला.
जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतीची पुष्कळ हानी झाली असून हानीची पहाणी करण्यासाठी कृषीमंत्री भुसे जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. ‘जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातही शेतीची पुष्कळ हानी झाली आहे. त्यामुळे त्यांनी याचीही पहाणी करून आमच्या समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या; मात्र ते भातकुली येथे न थांबल्याने त्यांना ‘काळे झेंडे’ दाखवण्यात आले आहेत’, अशी माहिती भातकुली येथील भाजपचे तालुका अध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले.