इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे – राज्यातील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अन् जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. ‘फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या महाराष्ट्र , कर्नाटक आणि गोवा या राज्यांसाठीच्या इलेक्ट्रिक तीन चाकी गाड्यांच्या वितरण सेवेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते.
इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य मिळावे, यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सरकारी आणि खासगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल यांचे वाढणारे दर, ग्लोबल वॉर्मिंग अन् प्रदूषण या समस्यांवर इलेक्ट्रिक वाहने हाच पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त, स्वच्छ, माफक आणि चांगला पर्याय असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.