साधिकेने श्रीकृष्णचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
१. हे श्रीकृष्णा, जन्माला येण्यापूर्वी आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण-नि-क्षण तू माझ्या समवेत होतास, आहेस आणि असणार आहेस; म्हणून तुझ्या चरणी ‘कृतज्ञ’ आहे रे !
२. मनुष्यजन्म देऊन तू या जन्माचे सार्थक केलेस आणि प.पू. डॉक्टर म्हणजे साक्षात् तूच, गुरु म्हणून मिळालास; म्हणून हे श्रीकृष्णा, तुझ्या चरणी कोटी-कोटी ‘कृतज्ञ’ आहे रे !
३. सनातनसारख्या ‘न भूतो न भविष्यती’ अशा संस्थेत आणलेस. ते जणू दैवी विश्वच आहे ! जन्मोजन्मींचे प्रारब्ध नष्ट करण्यासाठी आम्हाला व्यष्टी साधना शिकवलीस. ईश्वरी राज्य स्थापन व्हावे, यासाठी समाजाला जागृत करून सन्मार्गाकडे येण्यासाठी समष्टी साधनाही शिकवलीस; म्हणून हे श्रीकृष्णा, तुझ्या चरणी ‘कृतज्ञ’ आहे रे !
४. सगळ्या तीर्थक्षेत्रांपेक्षाही पवित्र, हिमालयासारखा विशाल आणि जिथे प.पू. डॉक्टरांच्या रूपात साक्षात् तूच वास्तव्य करतोस, असा हा दैवी रामनाथी आश्रम रहाण्यास दिलास; म्हणून हे श्रीकृष्णा, तुझ्या चरणी कोटी-कोटी ‘कृतज्ञ’ आहे रे !
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.