एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिरात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, हे सत्र चालू असतांना सौ. इव्होन प्रेगेंझर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
‘जानेवारी २०२० मध्ये सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात विदेशी साधकांसाठी साधकत्ववृद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मी तेथे गेले होते. शिबिराच्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, या सत्रात पू. भावना शिंदे यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगितल्या आणि त्यासाठी क्षमा मागितली. त्या वेळी मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी पुष्कळ चैतन्य जाणवले. मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत असतांना असेच वाटते. त्यानंतर मला सूक्ष्मातून दिसले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप सभागृहात आहे. ते त्यांच्या हाताने साधकांना हळुवारपणे जवळ करत आहेत. या शिबिराचे आयोजक आणि शिबिरार्थी सर्व एकच आहेत. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आहोत आणि एकमेकांमध्ये विलीन झालो. नंतर आम्ही केवळ चैतन्याच्या स्वरूपात राहिलो. ते चैतन्य एखाद्या कारंज्याप्रमाणे सर्व दिशेने लांबपर्यंत उसळत होते.’
– सौ. इव्होन प्रेगेंझर, ऑस्ट्रिया, युरोप.(८.१.२०२०)
|