आनंदी पुष्प होऊनी अर्पण व्हावे तव चरणी ।
राधेसम होऊनी
तव तत्त्वात लीन होऊ दे ।
गोपीसम होऊनी
तव स्मरण करत राहू दे ।। १ ।।
रूप तुझे पाहूनिया
भाव दाटूनी येई ।
आनंदी पुष्प होऊनी
अर्पण व्हावे तव चरणी ।। २ ।।
क्षणोक्षणी तव स्मरीत रहावे ।
तळमळ वाढे, तव चरणांशी नेहमी रहावे ।। ३ ।।
राहूनिया पिंजर्यात प्रयत्न अल्प सुटण्यासी ।
विविध माध्यमांतून प्रेरित करी सुटूनिया पिंजर्यातून ।। ४ ।।
साधनेसाठी क्षणी करी मायेतून मुक्ती ।
आपत्काळी राहूनी वाटे संपत्काळी ।। ५ ।।
– कु. सानिका सोनीकर (वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |