प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य श्री. प्रभातकुमार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेली ‘क्रिस्टल’ची प्रतिमा पाहून साधकांची भावजागृती होणे

प.पू. भक्तराज महाराज

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या विशाखापट्टणम् येथे गेल्या असतांना तेथील प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य श्री. प्रभातकुमार यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना क्रिस्टलची प.पू. भक्तराज महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली. ही अमूल्य भेट हातात घेऊन तिचे आलंबन केल्यावर प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे साधकांना पुढील अनुभूती आल्या.

‘या प्रतिमेतील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र तिन्ही बाजूंनी आपल्याकडे पहात आहे’, असे साधकांना जाणवले. साधकांना वायुतत्त्व आणि तेजतत्त्व यांच्या संयोगाने अन् कार्याच्या आवश्यकतेनुसार प्रतिमेतील डोळ्यांमध्ये सजीवता जाणवली, तसेच या प्रतिमेकडे काही क्षण पहात राहिल्यावर त्यांचा भाव जागृत झाला.

प.पू. भक्तराज महाराज यांची ही अमूल्य भेट श्री. प्रभातकुमार यांनी दिल्याविषयी सनातन परिवार त्यांच्याप्रती कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक