धर्माचे महत्त्व !
‘धर्म पाप-पुण्य, धर्माचरण इत्यादी संदर्भांत शिकवतो. त्यामुळे मुळातच व्यक्ती सात्त्विक बनते. तिच्या मनात चुकीची गोष्ट करण्याचा विचारही येत नाही. ती पापभीरू बनते, म्हणजे पाप करण्याचे, चुकीची गोष्ट करण्याचे टाळते. त्यामुळे कायद्यांची आवश्यकताच नसते. सत्ययुगात असे होते. तेव्हा राजाही नव्हता आणि कायदेही नव्हते; कारण सर्व जण सात्त्विक असल्याने राजाची अन् कायद्यांची आवश्यकताच नव्हती. आपणही सर्वांना धर्म शिकवल्याने कायद्यांची आवश्यकताच भासणार नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले