आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्यासाठी शिष्य बना !
गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा संदेश
‘साधकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साधकावस्थेचा पुढील आध्यात्मिक टप्पा म्हणजे शिष्यावस्था प्राप्त करणे. आज्ञापालन आणि तन-मन-धनाचा त्याग केलेल्या शिष्याचा योगक्षेम गुरुच वहात असतात. अशा शिष्याला कुठल्याही संकटाची झळ बसत नाही; कारण त्याच्यावर गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र असते. सध्याच्या आपत्काळात गुरूंचे प्रीतीमय कृपाछत्र अनुभवण्याची सुवर्णसंधी साधकांना आहे. येणार्या काळात संकटांचे मोठमोठे डोंगर आपल्याला पार करायचे आहेत. हे लक्षात घेऊन या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊया आणि त्यांचे खरे शिष्य बनण्यासाठी साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२८.४.२०२१)