‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे खालील छायाचित्र पाहून त्यांचे वय किती जाणवते ?’, ते कळवा !
सूक्ष्मातील प्रयोग
या छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्वचा, डोळे आणि तोंडवळ्यावरील भाव पहा. यांतून ‘त्यांचे वय किंवा अन्य काही गोष्टी यांविषयी काही वैशिष्ट्यपूर्ण जाणवते का ?’, याचा अभ्यास करा. आपल्याला जाणवलेली सूत्रे पुढील पत्त्यावर लिहून पाठवा.
संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com
पोस्टाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१
प्रयोगाचे उत्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/497052.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात. |