सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी आधुनिक वैद्य राधाकिशन पवार यांची नियुक्ती !
सातारा, २१ जुलै (वार्ता.) – सातारा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य अनिरुद्ध आठल्ये यांचे रत्नागिरी येथे स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी बीड येथून स्थानांतरीत होऊन आलेले आधुनिक वैद्य राधाकिशन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ जुलै या दिवशी ते जिल्हा परिषदेमधील कार्यालयात आपला पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद व्यवस्थापनाने दिली आहे.