इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘भक्तवात्सल्य आश्रमा’त प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला आजपासून प्रारंभ !
मुंबई – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये २२ आणि २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं परमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष शरद बापट यांनी दिली आहे. प.पू. भक्तराज महाराज हे सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे गुरु होत.
२२ जुलै या दिवशीचे कार्यक्रम
१. सकाळी १० वाजता : स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ
२. दुपारी ४ वाजता : उज्जैन येथील श्री. विठ्ठल पागे यांनी लिहिलेल्या ‘नाथ माझा भक्तराज’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या जीवनावर आधारित ग्रंथाच्या चतुर्थ आवृत्तीचे इंदूर येथील डॉ. मोहन बांडे यांच्या हस्ते प्रकाशन
३. दुपारी ४.३० वाजता : प.पू. भक्तराज महाराज यांच्या वर्ष १९९५ मध्ये ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाच्या ध्वनीचित्रफितीचे प्रसारण
४. रात्री ९.३० वाजता : पारंपरिक भजन
२३ जुलै या दिवशीचे कार्यक्रम
१. सकाळी ८ वाजता : श्री सत्यनारायण पूजन आणि श्री व्यास पूजन
२. सकाळी ९.३० वाजता : स्तवन मंजिरी आणि रामानंद बावनी पाठ
३. सकाळी ११.३० वाजता : श्रींच्या पादुकांवर अभिषेक, पूजन आणि आरती