मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर
कोल्हापूर, २१ जुलै (वार्ता.) – गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. आज दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. रंकाळा तलाव्याच्या पाण्यातही वाढ होत असून तलावातील पाणी सांडव्यावरून वहात आहे. पावसामुळे काही उपनगरांमधील वीज खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.
Kolhapur : कोल्हापुरात संततधार; यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर#maharashtrarainupdate #kolhapur @vijaykesarkar https://t.co/jjI4eBiXSZ
— ABP माझा (@abpmajhatv) July 21, 2021
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर एके ठिकाणी वडाचे मोठे झाड कोसळ्याने दोन घंटे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने झाड तोडून वाहतूक चालू केली.