२२ जुलैअखेर प्रशासनाने निर्णय न घेतल्यास २३ जुलैला व्यापार्यांनी दुकाने खुली करावीत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप
सांगली – कडक दळणवळण बंदी करूनही सांगलीत कोरोनाबाधितांचे प्रमाणात नियंत्रणात नाही. या बंदीमुळे व्यापारी, सामान्य नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात व्यापार खुला करण्यास अनुमती देण्यात आली आहे, मग सांगली जिल्ह्यावरच अन्याय का ? २२ जुलैअखेर प्रशासनाने निर्णय न घेतल्यास २३ जुलैला व्यापार्यांनी दुकाने खुली करावीत. दुकाने उघडतांना आम्ही तुमच्यासमवेत असू. खटले नोंद झाले तरी बेहत्तर, अशी चेतावणी भाजप खासदार संजय पाटील यांनी २० जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजप आमदार सुरेश खाडे, तसेच शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैशाळकर उपस्थित होते.