परम पूज्यांच्या रूपे श्रीविष्णु अवतरले ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

मायावी शक्तींचा चालला खेळ ।
देवा, जगी नसे कुणाचा मेळ ।। १ ।।

क्रूर, धर्मांध मोगलांनी हिंदूंना छळिले ।
शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापिले ।। २ ।।

इंग्रजांनी संस्कृती नष्ट करूनी देशवासियांना लुटले ।
स्वातंत्र्यविरांनी प्राणाहुती देऊनी स्वातंत्र्य मिळवले ।। ३ ।।

राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचार अन् अनीतीने जनतेस लुबाडले ।
रज-तमाच्या प्रदूषणाने भीषण आपत्काळास निमंत्रण दिले ।। ४ ।।

धर्मविरोधी अनिष्ट शक्तींनी साधक अन् भक्तगण त्रासले ।
परम पूज्यांच्या (टीप १) रूपे श्रीविष्णु अवतरले ।। ५ ।।

साधना करून घेऊनी साधकांना आनंदी केले ।
रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्रा’चे ते उद्गाते झाले ।। ६ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१२.२०२०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.