गुरुपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘गुरुपौर्णिमा’ हा शिष्य आणि साधक यांच्या जीवनातील सर्वांत मोठा उत्सव आहे. त्या निमित्ताने आपण तन, मन आणि धन यांचा त्याग अन् गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तसेच या निमित्ताने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे, समाजातील लोकांना ‘ऑनलाईन’ अर्पण करण्यासाठी सांगणे आदी धर्मसेवा करू शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २३ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मसत्संगाला उपस्थित रहाणार्‍या धर्मप्रेमींना या गुरुपौर्णिमेचा अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी एका ‘ऑनलाईन’ धर्मसेवा प्रशिक्षण सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पू. नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, बंगाल आणि आसाम येथील अनेक धर्मप्रमींनी घेतला.

क्षणचित्र

उत्तरप्रदेशचे धर्मप्रेमी श्री. राहुल वर्मा यांनी सांगितले की, या मार्गदर्शनानंतर मी सेवा करण्यासाठी आतूर झालो आहे. मला या गुरुपौर्णिमेचा अधिकाधिक लाभ घ्यायचा आहे.