संभाव्य तिसर्या लाटेत अधिक दायित्वाने काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर प्रवास केला. पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांनी काही वेळातच वरिष्ठ अधिकार्यांकडून कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन संभाव्य तिसर्या लाटेत अधिक दायित्वाने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, ऑक्सिजन, लसीकरण आणि संभाव्य तिसर्या लाटेविषयी करण्यात आलेल्या सिद्धतेविषयी माहिती दिली.