अमली पदार्थांच्या व्यवसायात नायजेरियाचे नागरिक प्रमुख सूत्रधार
गोवा शासनाने अमली पदार्थविरोधी कायद्यात सुधारणा करून अशा विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवायला हवे !
पणजी, १९ जुलै (वार्ता.) – गोव्यात अमली पदार्थांच्या व्यवसायामध्ये नायजेरियाचे नागरिक प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये वर्ष २०१९ पासून एकूण ४४७ जणांना अटक केली आहे. यांपैकी ९८ लोक विदेशी नागरिक असून त्यातील ५१ जण नायजेरिया या देशातील आहेत. या नागरिकांपैकी अमली पदार्थ पुरवणारा ‘मँगो’ या टोपणनावाने ओळखला जाणारा या व्यवसायातील प्रमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हे नायजेरियाचे नागरिक कोकेन, एल्एस्डी आदी प्रकारचे अमली पदार्थ ग्राहकांना पुरवतात, असे अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे. हे अमली पदार्थ विदेशातून मुंबई, देहली आणि बेंगळुरू येथील विमानतळावर येतात आणि त्यानंतर ते गोव्यात आणले जातात.