हे बिंब असे कि प्रतिबिंब असे । परम पूज्यांचे चैतन्य विलसत असे ।।
सर्व साधकांवर प्रीती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे मी देवद आश्रमाच्या प्रांगणात फिरत असतांना मला मावळता तांबूस चंद्र दिसला. ‘तो उगवता सूर्य आहे कि मावळता चंद्र आहे ?’, असे मला वाटले. त्या दोन्हींचे विस्मरण होऊन मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नयनमनोहर रूप दिसले. त्या वेळी भावावस्थेत जाऊन मी त्यांच्या चैतन्याने आनंदी झालो.
हा उगवता सूर्य असे कि मावळता चंद्र असे ।
परम पूज्यांचे (टीप १) मनोहर रूप दिसत असे ।। १ ।।
हे बिंब असे कि प्रतिबिंब असे ।
परम पूज्यांचे चैतन्य विलसत असे ।। २ ।।
हे चांदणे असे कि सूर्यप्रकाश असे ।
परम पूज्यांचे तेज सर्वत्र पसरत असे ।। ३ ।।
ही धरती असे कि सागर असे ।
प्रीतीसागर परम पूज्यांचे अमृत असे ।। ४ ।।
हे आकाश असे कि पाताळ असे ।
विष्णुस्वरूप परम पूज्यांचा वैकुंठलोक असे ।। ५ ।।
हा मनीचा खेळ असे कि सत्य असे ।
परम पूज्यांच्या सत्-चित्-आनंदाचा ठेवा असे ।। ६ ।।
ही जागृती, स्वप्न कि सुषुप्ती असे ।
परम पूज्यांच्या स्मरणाने ध्यान लागत असे ।। ७ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२९.११.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |