मुंबईतील पालट धोकादायक; भविष्यातील मोठ्या संकटाचे हे संकेत नाहीत ना ? – आमदार आशिष शेलार, भाजप
मुंबई – मुंबईत पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओसरलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले. २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना असा अनुभव आला नव्हता. भविष्यात मुंबईवर बेतणाऱ्या मोठ्या संकटाचे हे संकेत नाहीत ना ? अशी भीती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ‘ट्वीट’द्वारे व्यक्त केली.
मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही.
भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले…
गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 19, 2021
म्हणून मा. मुख्यमंत्र्यांना विनंती…
तातडीने महापालिकेसह लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी…या विषयातील तज्ज्ञांना बोलवावे व त्वरीत आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत.
मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत.
नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 19, 2021
एका ‘ट्वीट’मध्ये त्यांनी म्हटले की, मुंबईत या वेळी दिसणारे पालट धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ ? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक घ्यावी. तज्ञांना बोलवावे आणि आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत.