पाकमध्ये वयाची १८ वर्षे होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला एका मंत्र्याकडून विरोध
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील धार्मिक विषयांचे मंत्री नूर उल हक कादरी यांनी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.
१. अल्पसंख्यांकांच्या अधिकाराविषयी सिनेट संसदीय समितीचे सदस्य कादरी म्हणाले की, वयाची १८ वर्षे होण्यापूर्वी धर्म पालटणे एखाद्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्याला कुणी अडवू शकत नाही. जर कुणी वयाच्या १४ व्या वर्षी दुसरा धर्म स्वीकारू इच्छित असेल, तर त्यावर बंदी आणली जाऊ शकत नाही. वयाची १८ वर्षे होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याचे समर्थन मी करत नाही. इस्लाममध्ये १८ वर्षे पूर्ण होण्याआधी धर्म पालटल्याची अनेक उदाहरणे आहेत; परंतु विवाह करण्यासाठी योग्य वय असण्याच्या सूत्राला कायद्यानुसार नियंत्रित केले जाऊ शकते आणि त्यासाठी ‘कौन्सिल ऑफ इस्लामिक आयडिओलॉजी’शी चर्चा करू शकतो.
Pakistani minister opposes restrictions on the religious conversion of minors, says ‘it’s their choice’https://t.co/VajRmJ3JGX
— OpIndia.com (@OpIndia_com) July 15, 2021
२. पाकमधील सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. या ठिकाणी धर्मांतर होण्याच्या घटना पुनःपुन्हा घडत आहेत. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे हे सूत्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे. याविषयी कादरी म्हणाले, ‘‘कुणी बलपूर्वक धर्मांतर करत असेल, तर त्याची चौकशी केली जाईल.’’ (पाकमध्ये रहाणार्या कित्येक हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण करून धर्मांतर केल्याच्या घटना दिवसागणिक घडत आहेत. अशा किती प्रकरणांच्या चौकशा झाल्या ? आणि आतापर्यंत किती जणांना शिक्षा झाली ? मंत्री कादरी यांचा १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला विरोध हा अल्पवयीन हिंदु किंवा ख्रिस्ती मुलींचे सहजरित्या धर्मांतर करून या दोन्ही धर्मांतील समाजाला नामशेष करणे, याच हेतूपोटी आहे ! – संपादक)
३. पाकच्या सिनेटमधील अल्पसंख्यांक समुदायाचे सदस्य दानिश कुमार यांनी समितीला सांगितले की, बलुचिस्तानमधील दलबंदिन भागात एक धार्मिक नेता धर्मांतर करण्याला प्रोत्साहन देत आहे. (अशा नेत्यावर पाक कधीही कारवाई करणार नाही, हेही तितकेच खरे ! – संपादक)