चाकण (पुणे) येथे २ युवकांच्या मृत्यूप्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद
कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा !
चाकण – गरम लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करून २ युवकांची हत्या केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळू गावडे आणि राहुल गावडे अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे असून बाळू गावडे वीटभट्टी मालक मरगज यांच्याकडे कामाला होता. त्याचे मरगज यांच्या मुलीबरोबर प्रेमप्रकरण जुळले. दोघे बेपत्ता झाले असता त्यांना शोधून मरगज यांनी नातेवाइकांच्या साहाय्याने त्यांना मारहाण केली. यात मरगज यांची मुलगी घायाळ झाली, तर २ युवकांचा मृत्यू झाला. बाळू गावडे यांचा विवाह झाला असून त्यांच्या पत्नीचाही मारहाणीच्या गुन्ह्यात सहभाग आहे.