‘स्वॅब’ पडताळणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘स्वॅब’ पडताळणी पथकाकडून ‘स्वॅब’साठी सरसकट नागरिकांवर बळजोरी करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवरही लसीकरण, ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीच्या वेळी गोंधळाच्या आणि वादावादीच्या घटना घडत असल्याने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तरी ‘स्वॅब’ पडताळणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी ई-मेल द्वारे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केल्या आहेत.

या मेलमध्ये पुढे म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल एक मासाच्या विलंबाने प्राप्त होत आहे. अशा घटनांमुळे शहरवासियांना नाहक त्रास होत आहेच, तसेच प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरी यात तात्काळ सुधारणा व्हावी.