मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देहली भेटीवर
नवीन झुवारी पूल, राष्ट्रीय हमरस्ता बांधकाम आणि धनगर समाजाला केंद्रीय अनुसूचित जमातीच्या सूचीत समाविष्ट करणे या मागण्यांचा पाठपुरावा करणार
पणजी, १८ जुलै (वार्ता.) – नवीन झुवारी पूल आणि राष्ट्रीय हमरस्ता बांधकाम हे प्रकल्प, तसेच धनगर समाजाला केंद्रीय अनुसूचित जमातीच्या सूचीत समाविष्ट करण्याची मागणी, या सूत्रांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर १८ जुलै या दिवशी देहलीला रवाना झाले.
देहली भेटीच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नवीन झुआरी पूल आणि राष्ट्रीय हमरस्ता बांधकाम या प्रकल्पांविषयी चर्चेसाठी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक आणि हमरस्ता मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. गोव्यातील धनगर समाजाला केंद्रीय अनुसूचित जमातीच्या सूचीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे गोव्यातील राजकारणावरून ते देहली येथे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘देहली भेटीच्या वेळी शक्य झाल्यास मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.’’