छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या छिंदमच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद !
अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर केवळ गुन्हे नोंद न करता त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
नगर – काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेले माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्यांचे भाऊ श्रीकांत छिंदम यांच्या विरोधात टपरीचालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. ही टपरी जेसीबीने उखडून टाकून जागा बळकावण्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. छिंदम, त्यांचे भाऊ आणि ३० ते ४० जण यांविरोधात देहलीगेट येथील टपरी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे. भागीरथ बोडखे असे टपरीचालकाचे नाव असून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. छिंदम यांनी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली तसेच टपरीमधील साहित्य फेकून देत ३० सहस्र रुपयांची रक्कम काढून घेतली. जेसीबीच्या साहाय्याने बोडके यांची टपरी तोडून बाजूला केली आणि तिथे अन्य बारा पत्र्याच्या टपर्या उभ्या केल्या, असा आरोप टपरीचालकाने केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह जमावाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.