शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा मिरज येथे प्रारंभ !
मिरज – शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज तालुका जनसंपर्क कार्यालय येथे प्रारंभ करण्यात आला. या वेळी शिवसेना महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा संघटक बजरंग पाटील, शाखाप्रमुख कुबेरसिंह राजपूत, मिरज शहरप्रमुख विजय शिंदे, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, मिरज तालुकाप्रमुख संजय काटे, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे, सरोजनी माळी, रुक्मिणी अंबीगेर यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
महा ई-सेवा केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – विशालसिंह राजपूत
या प्रसंगी शिवसेना मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत म्हणाले, चालू करण्यात आलेल्या महा ई-सेवा केंद्राच्या वतीने आधार कार्ड, शिधापत्रिका, पॅन कार्ड, वाहन परवाना, संजय गांधी निराधार योजना, पारपत्र यांसह अन्य कामांसाठी नागरिकांनी धाडस चौक येथील तालुका कार्यालयात संपर्क साधावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून हे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम आता केले जाणार आहे.