पिंपरी येथील स्वयंघोषित भाई पोलिसांच्या कह्यात !
चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून फिरतात’, असे म्हणणारे गुंड काय सांगत आहेत, हे लक्षात घेऊन अशा गुंडांना आणि त्यांची सूत्रे फिरवणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
पिंपरी – हातात कोयता घेऊन ‘आमची सूत्रे येरवडा जेलमधून फिरतात’, असे म्हणत व्हिडिओ बनवून तो सामाजिक प्रसारमाध्यमांवर पाठवणार्या स्वयंघोषित भाईला गुंडाविरोधी पथकाने कह्यात घेतले आहे. मयुर अनिल सरोदे उपाख्य यमभाई (वय २१ वर्षे, रहाणार दुर्गानगर, आकुर्डी) असे या आरोपीचे नाव असून या तरुणाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गुंडाविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी आरोपीला कह्यात घेतले. तसेच तो रहात असलेल्या परिसरातून त्याच्या हातात बेड्या घालून त्याची धिंड काढली.