पाकसाठी हेरगिरी करणार्या पोलीस शिपायाला अटक
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !
पलवल (हरियाणा) – सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलीसदलात भरती झालेल्या सुरेंद्र या पोलीस शिपायाला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो पलवल येथील जिल्हा पोलीस कार्यालयात तैनात होता. त्याच्याकडून २ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला तो भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवत होता.
Initial investigation revealed that he (constable) came in contact with Pakistani agencies through a female friendhttps://t.co/lyRa0RGRp0
— India TV (@indiatvnews) July 16, 2021
वर्ष २०१८ मध्ये सैन्यातून निवृत्त होण्यापासून तो पाकसाठी हेरगिरी करत भारतीय सैन्याची माहिती पुरवत होता. त्यासाठी त्याला आतापर्यंत ७० सहस्र रुपये मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. सुरेंद्र फेसबूकद्वारे पाकमधील एक तरुणीच्या संपर्कात होता. पोलीस सुरेंद्र याची अधिक खोलवर चौकशी करत आहेत.