युवतीची फसवणूक करणार्या धर्मांध बंगाली बाबाला अटक
या बंगाली बाबांच्या विरुद्ध अंनिस कृती न करता हिंदु साधूसंतांना मात्र त्रास देते, हे हिंदूंच्या लक्षात आले आहे.
नवी मुंबई – प्रियकराला वश करून देण्यासाठी एका युवतीकडून लाखो रुपये उकळणार्या भोंदू बंगाली बाबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वासिम रइस खान उपाख्य बाबा कबिर खान बंगाली असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे. लोकलमधून प्रवास करतांना बंगाली बाबाची जाहिरात वाचून या युवतीने त्याला संपर्क केला होता. त्याने वरील समस्या सोडवण्यासाठी युवतीचा विश्वास संपादन करून ४ मासांत ४ लाख ५७ सहस्र रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या युवतीने आरोपीकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यावर ‘तुला काळी जादू करून तुझा अपघात घडवेन’, अशी धमकी दिल्यावर या युवतीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासाअंती पोलिसांनी मीरा रोड परिसरातून या बंगाली बाबाला अटक केली.