कोल्हापुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर; मात्र त्यात सुधारणा होत आहे ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
कोल्हापूर, १६ जुलै – कोल्हापुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे; मात्र त्यात सुधारणाही होत आहे. लसीकरणाचा कोल्हापूर ‘पॅटर्न’ इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला पाहिजे. कोल्हापूरचा कोरोना संसर्गाचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ अधिक असल्याने लसीकरणासाठी वाढीव डोस देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. कोल्हापुरात आयोजित आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
१. आता आठवड्यात ८६ सहस्र चाचण्या होत आहेत. सध्या ‘पॉझिटिव्हिटी रेट’ ९.०६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जुलै संपेपर्यंत हा ‘रेट’ अल्प होईल, अशी आशा करू.
२. आठवड्याचे परिणाम आले असून त्यानुसार पुढील आठवड्याचा निर्णय घेतला जाईल. जुलै-ऑगस्टमध्ये कोल्हापूरमध्ये पूर येतो. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. पूर येणार्या १७१ गावांत लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
३. जिल्ह्यात १७ ऑक्सिजन प्लांट जुलैअखेर चालू होतील. हे प्लांट राज्याच्या दृष्टीनेही उपयोगी पडतील. तिसर्या लाटेत ऑक्सिजन अधिक लागेल, असे सूतोवाच पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. जरी तिसरी लाट आली, तरी उद्योग बंद राहू नयेत, यासाठी मालकांनी कामगारांचे लसीकरण केले पाहिजे.