कोल्हापुरातील सर्व व्यापार सोमवारपासून चालू होतील ! – ललीत गांधी
कोल्हापूर, १६ जुलै – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राजारामपुरी व्यापारी असोसिएशन यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन व्यापार चालू करण्याची मागणी केली. त्या वेळी आरोग्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील सर्व व्यापार सोमवारपासून चालू होतील, अशी ग्वाही देत तसे आदेश निर्गमित करू अशी माहिती दिली. ललीत गांधी आणि विविध व्यापारी संघटनांनी राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी व्यापार चालू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललीत गांधी यांनी पत्रकारांना दिली.