भारतात आता लँब्डा संसर्गाचा धोका !
पुणे, १५ जुलै – कोरोनाच्या दुसर्याला लाटेनंतर डेल्टामध्ये म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा भारतात लागला आहे. त्यानंतर लँब्डा या आणखी एका म्युटंट कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होत आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, लँब्डा विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये ७ ठिकाणी म्युटेशन्स झालेली आहेत. त्यामुळे कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा तो सर्वात अधिक वेगाने संक्रमित होतोय. भारतात उद्भवलेल्या डेल्टा विषाणूमध्ये या पद्धतीची ३ म्युटेशन्स आढळून आली होती आणि ती मुळच्या सार्स कॉव्ही २ विषाणूपेक्षा ६० टक्के अधिक मारक ठरत आहेत. त्यामुळे आता नवा कोणताही विषाणू सिद्ध झाला, तरी त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोरोनाच्या काळात ज्याप्रमाणे स्वत:ची सुरक्षा तशीच घेणे अपेक्षित आहे.
नवीन येणार्या विषाणूंना रोखण्यासाठी सध्याच्या लसींमध्ये आमुलाग्र पालट करावे लागतील. या लँब्डाचा अर्जेटिना, चिली, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडासह अनुमाने ३० देशांपेक्षा अधिक देशांमध्ये फैलाव झाला आहे.