जग कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहे ! – जागतिक आरोग्य संघटना
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – दुर्दैवाने जग कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहे. कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा वेगाने होणारा प्रसार, अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा होऊ लागलेली गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रभावीपणे न होणारा वापर या गोष्टी कोरोनाचे रुग्ण अन् कोरोनामुळे होणारे मृत्यू पुन्हा वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेसेस यांनी स्पष्ट केले आहे.
In its COVID-19 Weekly Epidemiological Update released on Tuesday, the World Health Organisation said that an overall rise in COVID-19 cases due to the Delta variant is reported across all WHO regions.https://t.co/v3qsBV798W
— Economic Times (@EconomicTimes) July 14, 2021
डॉ. टेड्रॉस म्हणाले की, गेेल्या काही मासांमध्ये कोरोनाचे रुग्ण जगभरात अल्प होऊ लागल्याचे दिसून आले होते. व्यापक प्रमाणावर करण्यात येत असलेल्या लसीकरणामुळे हे शक्य झाले होते. विशेषत: युरोप आणि उत्तर अमेरिका येथे हे घडून आले; मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू पसरू लागला असून तो त्याची रूपे पालटत आहे.