सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या ‘विशेष सत्संग मालिके’चे प्रक्षेपण !
कोल्हापूर – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष नामजप सत्संग मालिका सिद्ध करण्यात आली आहे. ही मालिका २२ जुलैअखेर सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात येणार आहे. तरी याचा अधिकाधिक जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर – कोल्हापूर येथील ‘बी न्यूज’च्या भक्ती वाहिनीच्या ५३१ क्रमांकाच्या वाहिनीवर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता याचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.
सांगली – सांगली येथील ‘सांगली मीडिया कम्युनिकेशन’च्या (सी न्यूज) भक्ती वाहिनीच्या १०८ क्रमांकाच्या वाहिनीवर प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता याचे प्रक्षेपण करण्यात येत आहे.