साधकां भेटी परम पूज्य आले ।
साधकांवर गुरुकृपा करून त्यांना मोक्षाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
कलियुगामाजी अद्भुत घडले ।
मानवाच्या कल्याणा
भगवंत प्रगटले ।
साधकां भेटी परम पूज्य (टीप १) आले ।। १ ।।
प्रल्हादा रक्षण्या भगवंत गेले ।
साधकांना रक्षण्या
परम पूज्य आले ।
गुरुकृपा करूनी मोक्षाकडे नेले ।। २ ।।
धर्मसंस्थापनेसाठी श्रीकृष्ण अवतरला ।
कलियुगी धर्मविरोधकांनी धर्माला बुडवले ।
परम पूज्य हिंदु राष्ट्र स्थापण्या अवतरले ।। ३ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |