उत्तरप्रदेशमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांच्या ४ साथीदारांना अटक !
अशांना कारागृहात ठेवून आजन्म पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या (‘पाया’ किंवा ‘आधार’) दोघा आतंकवाद्यांना केलेल्या अटकेनंतर त्यांच्या ४ साथीदारांना कानपूर आणि लक्ष्मणपुरी येथून आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लक्ष्मणपुरीच्या बुद्धा पार्कजवळून शकील आणि मुस्तकीम, तर कानपूर येथून लईक आणि आफाक यांना अटक करण्यात आली आहे. हे चौघे प्रथम अटक केलेल्या दोघा आतंकवाद्यांना पिस्तुले आणि स्फोटके पाठवत होते. शकील केवळ दाखवण्यासाठी ई-रिक्शा चालवत होता. आतंकवादविरोधी पथक या प्रकरणी उत्तरप्रदेशातील संभल आणि अन्य ३ जिल्ह्यांमध्ये अन्वेषण करत आहे. पथकाने अनेकांची चौकशी केली आहे.