सी.एन्.जी.सह पाईप गॅसच्या दरात वाढ !
मुंबई – पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या पाठोपाठ सी.एन्.जी. आणि पीएनजी गॅसच्या मूल्यातही १४ जुलैपासून वाढ करण्यात आली आहे. ‘महानगर गॅस लिमिटेड’ या इंधन पुरवठादार आस्थापनाद्वारे मुंबईत सी.एन्.जी.च्या मूल्यात प्रती किलो २ रुपये ५८ पैशांची वृद्धी करण्यात आली. ‘वाहतूक आणि अन्य व्ययात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आली’, असे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. या दरवाढीने मुंबईतील रिक्शाचालक आणि टॅक्सीचालक यांना फटका बसणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला झळ बसेल. पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार आहे. सी.एन्.जी.चा भाव एक किलोसाठी ५१ रुपये ९८ पैसे इतका असणार आहे, तर पाईप गॅससाठी प्रती युनिट ५५ पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे.