बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
पुणे – बैलगाडा शर्यतीवर बंदी असतांनाही मावळातील शिवणे गावाच्या हद्दीत मोकळ्या माळावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणार्या २० युवकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी आयोजकांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आशिष काळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ११ जुलै या दिवशी शर्यतीच्या वेळी बैलांना पीडा होईल, अशा प्रकारे वागवून बैलांना गाडीला जुंपून त्यांना चढणीच्या रस्त्याने घाटात चढायला जाण्यासाठी त्यांचा छळ केला. (आयोजकांवर गुन्हे नोंद करण्यासमवेत त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक)