चांगली नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्या ‘कॉल सेंटर’वर सायबर पोलिसांची कारवाई !
समाजाची नीतीमत्ता खालावत चालल्याचे उदाहरण !
पुणे – चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या आमीषाने फसवणार्या ‘कॉल सेंटर’वर कारवाई करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले असून ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पुणे येथील उच्चशिक्षित महिलेला बहुराष्ट्रीय आस्थापनात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिच्याकडून ९ लाख २५ सहस्र रुपये आरोपींनी लुटले. या प्रकरणी तक्रारदारांची ९९ टक्के रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे ‘नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी’, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.