मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना अग्नीशमनदलाच्या जवानांनी पावसात भिजून दिली मानवंदना !
मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी १२ जुलै या दिवशी अग्नीशमनदलाच्या मुख्यालयाला भेट दिली. या वेळी अग्नीशमनदलाच्या ६४ पोलिसांच्या तुकडीने भरपावसात भिजून त्यांना मानवंदना दिली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव येथे त्यांना मानवंदना देण्यासाठी उभे असलेले पोलीस पावसात भिजतील म्हणून त्यांना मानवंदना न देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे अश्विनी भिडे यांनाही मानवंदना टाळता आली असती का ?, असा प्रश्न सामाजिक माध्यमांवर उपस्थित करण्यात येत आहे.
पावसात भिजत जवानांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना मानवंदना,
अग्निशमन दलाच्या जवानांना भर पावसात उभं राहायची गरज होती?https://t.co/HlTccJoJED @AshwiniBhide
— ABP माझा (@abpmajhatv) July 12, 2021
मानवंदना देण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून जवान मैदानावर उभे होते. सकाळी ११ वाजता अश्विनी भिडे मुख्यालयाच्या ठिकाणी आल्या. तोपर्यंत जवानांना उभे रहावे लागले. अश्विनी भिडे आल्या त्या वेळी पाऊस पडू लागल्याने जवानांना पावसात भिजून मानवंदना द्यावी लागली.