कोरोना महामारीशी निगडित सेवेतील तणावामुळे आधुनिक वैद्यांच्या आरोग्यावर परिणाम !
३ आधुनिक वैद्य हृदयरोगामुळे रुग्णाईत !
आधुनिक वैद्यांनाही आताच्या आपत्काळात भगवंताची आराधना करून त्याचे साहाय्य घेण्याविना पर्याय नाही ! साधना हेच सर्व समस्यांवरील उत्तर असून सर्वशक्तीमान ईश्वरालाच शरण जायला हवे !
पणजी, १३ जुलै (वार्ता.) – कोरोना महामारीशी निगडित सेवेतील तणावामुळे आधुनिक वैद्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे का ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एक वरिष्ठ आधुनिक वैद्य हृदयरोगामुळे त्रस्त आहेत आणि त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींना पाठवलेल्या सामाजिक माध्यमांतील संदेशामुळे हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील २४ घंट्यांमध्ये सुमारे
५० वर्षे वयाच्या ३ आधुनिक वैद्यांना हृदयरोगामुळे उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले आहे, तसेच काही दिवसांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एक वरिष्ठ महिला आधुनिक वैद्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे.
हृदयरोगामुळे रुग्णाईत झालेले गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एक वरिष्ठ डॉक्टर सामाजिक माध्यमांतील संदेशात म्हणतात, ‘‘मला माझ्या या वयात कोणतेही पूर्वकारण नसतांना, कुटुंंबात हृदयविकाराचा इतिहास नसतांना, मला कोणतेही व्यसन नसतांना किंवा आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नसतांना हृदयरोग कसा झाला ? याला कामावरील सततच्या ताणाविना दुसरे कोणतेही कारण असू शकत नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील माझ्या वयाचे (वय सुमारे ५० वर्षे) ३ आधुनिक वैद्य सध्या हृदयरोगामुळे रुग्णालयात भरती आहेत. देवाने न थांबता करत असलेल्या कामातून सुटी घेण्याचा संदेश आम्हाला या माध्यमातून दिला आहे.’’