तज्ञ समितीचा सल्ला घेऊनच संचारबंदी उठवण्याविषयीचा निर्णय घेणार ! – मुख्यमंत्री
पणजी, १३ जुलै (वार्ता.) – कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा दर सध्या ३-४ टक्के आहे. हा दर घटल्यानंतरच राज्यस्तरीय संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेता येणार आहे. तज्ञ समितीचा सल्ला घेऊनच संचारबंदी उठवण्याविषयीचा निर्णय घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्णआढळण्याचा दर घटवणे, हे अधिक प्रमाणात लोकांवर अवलंबून आहे. लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले पाहिजे.’’