सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ९ सहस्र ९७१ नागरिकांचे लसीकरण
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात १३ जुलै या दिवशी कोरोनाचे १६० नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४५ सहस्र १६५ झाली आहे. १३ जुलैला ९८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४० सहस्र ७२६ झाली आहे. सद्य:स्थितीत ३ सहस्र २९ रुग्णांवर उपचार चालू आहेत. १३ जुलैला ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र १३९ झाली आहे. उपचार चालू असलेल्या ४५ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) मिळून एकूण ३ लाख ९ सहस्र ९७१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.