(म्हणे) ‘संघातील अनेकांनी लग्न केले नाही, त्यांच्यासाठी एक ‘पॉलिसी’ बनवा !’ – नवाब मलिक
मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेकांनी लग्न केलेले नाही, त्यांना मुले नाहीत. त्यांच्यासाठी एक ‘पॉलिसी’ (धोरण) बनवा, असे वादग्रस्त वक्तव्य अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नवाब मलिक म्हणाले की, दोन अपत्य हे धोरण २१ वर्षांपासून महाराष्ट्रात आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता हा दिंडोरा पिटत आहेत. (योगीजींनी घेतलेला निर्णय धर्मांधांच्या वर्मी लागणारा असल्याने अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत, असे जनतेला वाटते. महाराष्ट्रातील अपत्यांविषयीच्या धोरणाविषयी कधी कार्यवाही झाली का ? – संपादक) साक्षी महाराज म्हणतात, ‘पुष्कळ मुले’ जन्माला घाला, मग यांना कुठली पॉलिसी ? असेही वादग्रस्त वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे.