गुरुमाऊली, तुझ्या कृपेने होईल हिंदु राष्ट्र साकार ।
हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
असो गुरुमाऊली (टीप १)
तुझ्या चरणी नमस्कार ।
तुझ्या अनंत कृपेला
नाही पार ।। धृ.।।
तुझ्या कृपेने दगडातूनी
घडते मूर्ती ।
तुझ्या कृपेने भाव आणि
प्रीतीचे पाझर फुटती ।। १।।
तुझ्या भक्तीने होतो नराचा नारायण ।
तुझ्या कृपेने होतो आपत्काळ सुखकर ।। २ ।।
तुझ्या कृपेने निपटेल भ्रष्टाचार ।
तुझ्या कृपेने होईल धर्मानुसार आचार ।। २ ।।
तुझ्या कृपेने होईल साक्षात्कार ।
तुझ्या कृपेने उघडेल मोक्षाचे द्वार ।। ३ ।।
तुझ्या कृपेने समष्टी सेवेचा आधार ।
तुझ्या कृपेने होईल हिंदु राष्ट्र साकार ।। ४ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.११.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |