मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण ! – विकास दवे, संचालक, मध्यप्रदेश साहित्य अकादमी
‘शिक्षणाचा हेतू काय आहे ?, पुस्तकांतून मुलांना कोणते ज्ञान दिले पाहिजे ?’, याचा विचार करायला हवा. जे शिक्षण मुक्ती देते, तेच खरे शिक्षण ! ऋषिमुनींनी आंतरिक ज्ञानाला प्रकट करण्याची शिक्षणपद्धत चालू केली होती; पण त्याच्या मूळ उद्देशापासून आपण भरकटलो आहोत. सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण देणे, हे सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे. त्यासाठी आध्यात्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करावी !