भंडारदरा (नगर) परिसरात मद्यपी पर्यटकांची पोलीस आणि ग्रामस्थ यांना मारहाण
मद्यबंदी हटवणारे प्रशासन मद्याचे दुष्परिणाम लक्षात घेणार का ?
पोलीस मार खातात यातून पोलिसांना प्रशिक्षण दिले जाते कि नाही, असा प्रश्न पडतो !
नगर – येथील भंडारदरा धरणात पर्यटक बुडाल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे आले असता पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने ते परत जाऊ लागले. त्या वेळी ५ मद्यधुंद पर्यटकांनी पोलिसांना दमदाटी करण्यास प्रारंभ केला. पोलिसांची संख्या अल्प असल्याने तेथील व्यावसायिक प्रकाश खाडे साहाय्याला धावून आले. त्या वेळी पर्यटकांनी खाडे यांनाच मारहाण चालू केली. हे दृश्य पाहून आणखी काही ग्रामस्थ साहाय्याला धावले. पोलीस आणि त्यांच्या साहाय्याला धावलेले ग्रामस्थ यांनाही मद्यपी पर्यटकांनी धक्काबुक्की अन् मारहाण केली. त्यातील दोघे पर्यटक सैन्यदलात असल्याचे समजते. ग्रामस्थांच्या साहाय्याने मद्यपींना पकडून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.