(म्हणे) ‘राज्यात आमचे सरकार आल्यावर पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्यांना मूत्र पाजू !’
|
अशा नेत्यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकले पाहिजे आणि त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! |
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजयपाल सिंह यांची पत्नी स्थानिक निवडणुकीत पराभूत झाली. त्यानंतर सिंह यांनी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांना, ‘राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास तुम्हाला मूत्र पाजले जाईल’, अशी धमकी दिली. या धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी सिंह आणि त्यांचे ३० साथीदार यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
Former Samajwadi MLA gives ‘peshab’ threat to police, claims he made police drink urine, bookedhttps://t.co/C2eEXXvymt
— OpIndia.com (@OpIndia_com) July 11, 2021
पत्नीच्या पराजयानंतर विजयपाल सिंह त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी मतमोजणी केंद्रावर जात असतांना पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना रोखले. त्यामुळे त्यांनी ही धमकी दिली.