वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा
वॉशिंग्टन (अमेरिका) – जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. अशा प्रकारचा पालट चंद्रावरही होऊ शकतो. वर्ष २०३० मध्ये हवामान पालटामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्यासह चंद्र त्याच्या कक्षेपासून बाजूला सरकणार आहे. त्यामुळे विनाशकारी पूर येण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने तिच्या अहवालात म्हटले आहे.
A ‘wobble’ in the moon’s orbit could result in record flooding in the 2030s, new study finds https://t.co/Z6nAtxEeBB
— Live Science (@LiveScience) July 12, 2021
या अहवालात म्हटले आहे की, समुद्राच्या लाटा नेहमीच्या तुलनेत २ फूट अधिक उंच असतील. घरामध्ये पाणी भरू शकते. अशी स्थिती पुढील १० वर्षे अधूनमधून उद्भवेल.